ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:31 PM2022-02-02T21:31:49+5:302022-02-02T21:32:05+5:30

अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचाजागीच दुर्दैवी अंत झाला.

father and son died in bolero blow at dhakni terrible accident while overtaking a trolley | ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात

ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हसवड :  नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट व त्यांचा मुलगा विश्वास नरबट यांच्या दुचाकीला ढाकणी फाट्यावर अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचाजागीच दुर्दैवी अंत झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.

 पोपट तातोबा नरबट (वय ५२) व त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट(वय १३, दोघे रा.नरबटवाडी, ता.माण) अशी अपघातात ठार झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोपट नरबट हे दुचाकीवरून मुलाला घेऊन वह्या आणण्यासाठी म्हसवडकडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. या ट्रॉलीला ओव्हरटेक करून नरबट पुढे जात असताना समोरुनयेणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. हीधडक इतकी भीषण होती की, त्यांचा मुलगा विश्वास हा जागीच ठार झाला. तर पोपट नरबट हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले. या अपघातानंतर बोलेरो गाडी चालक गाडीसह पसार झाला. रस्त्यात निष्काळजीपणे ट्राॅली उभी करणाऱ्या आणि अज्ञात बोलेरो चालकावर म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोपट नरबट हे सामाजिक कार्यात हिरेरिने सहभाग घेत असत. नरबटवाडी येथे अद्यावत वाचनालय उभे करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. तसेच प्राथमिक शाळाही तालुक्यातील एक आदर्श शाळा बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पत्नी आशा वर्कर म्हणून शासकिय आरोग्य विभागात काम करत असताना कोरोना काळात पत्नीबरोबर ढाकणी नरबटवाडी येथे फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले होते.

स्वत: जीव जातानाही मुलासाठी टाहो!

अपघाताऩंतर मुलगा निपचित पडून आहे, हे लक्षात येताच मुलासाठी वडिल गंभीर जखमी असतानाही अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा, असा टाहो फोडत होते. यावेळी ढाकणी येथील धीरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. दोघा बापलेकावर काळाने घाला घातला. याघटनेने ढाकणी, नरबटवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: father and son died in bolero blow at dhakni terrible accident while overtaking a trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.