नांदणी नदीवरील अमरापूर पूल खचण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:43+5:302021-07-24T04:17:43+5:30
कडेगाव तालुक्यात गेल्या वर्षापासून विजापूर-गुहागर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. अमरापूर येथील नांदनी नदीवरील पूल धोकादायक ...
कडेगाव तालुक्यात गेल्या वर्षापासून विजापूर-गुहागर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. अमरापूर येथील नांदनी नदीवरील पूल धोकादायक बनला होता. तो पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यांमुळे वाहतुकीसाठी या ठिकाणी नदीवर पाइप व मुरुम टाकून कच्चा पूल तयार केला आहे; परंतु मुसळधार पावसाने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या पुलावरही पाणी येण्याची भीती आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना सध्या नेवरी, खेराडे -विटा, चिखली कडेपूर या मार्गाने दहा ते पंधरा किलोमीटर फिरून लांबून जावे लागत आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील अमरापूर, शिवणी, हणमंतवडिये, कडेगाव, आंबेगाव, येतगाव, नेवरी यासह अन्य गावातील ओढे, बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.
फोटो : २३ कडेगाव १
ओळ : अमरापूर (ता. कडेगाव) येथील विजापूर - गुहागर महामार्गावरील नांदनी नदीवरील पुलाच्या उंचीइतकी पाणी पातळी वाढली आहे.