पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 08:30 PM2018-12-06T20:30:20+5:302018-12-06T21:38:41+5:30

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे ...

Fear of production due to water scarcity; 8 plumbing jam | पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

Next
ठळक मुद्दे प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे.

एमआयडिसीमधील पुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने काही उद्योगांमधील उत्पादन थांबल्याचेही सांगण्यात आले. तर ८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात पाणीबाणी निर्माण झाली असून नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडिसी ही जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. येथे काही मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये अनेकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या टॅँकरच्या अपघातानंतर येथील उद्योगांमधील काम ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिकही खासगी टॅँकरचे पाणी मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. मात्र त्यातून अनेक व्यवसायांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागवली जात आहे. काही उद्योगांच्या परिसरात बोअरवेलचे पाणी मिळत आहे. येत्या चार दिवसात औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा सुरू न झाल्यास पाण्याच्या वापरातून उत्पादन होत असलेल्या अनेक उद्योगांमधील उत्पादन प्रक्रीया ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

औद्योगिक वसाहतीची पाणी समस्या गंभीर बनलेली असतानाच एमआयडिसी पाणी पुरवठा करीत असलेल्या कुवारबाव, मिरजोळे, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिºयासह आठ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातही अभूतपूर्व पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांच्या विहिरी आहेत त्यांना टंचाईची झळ कमी बसत असली तरी असंख्य कुटुंब केवळ नळपाणी योजनेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे खुपच हाल होत आहेत.

खासगी टॅँकरकडून पुरवठा
पाणी टंचाईमुळे खासगी टॅँकरचे पाणी विकत घेणे हाच अनेकांसमोरील एकमेव पर्याय ठरत आहे. त्यामुळे खासगी वाहनातून टॅँकरने पाणी पुरवठा करणाºयांकडे पाणी मागणी करणाºयांची संख्या वाढली आहे. परिणामी टॅँकरचे पाणीही वेळेत मिळत नसल्याची स्थिती आहे. समस्या लक्षात घेऊन खासगी टॅँकरने पाणी पुरवठा करणारेही जनतेला सहकार्य करीत आहेत.

टॅँकरने पाणी पुरवा
एमआयडिसीने पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असल्याची दवंडी रीक्षातून देण्यात आली. मात्र आपत्कालिन स्थितीत गावातील नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. अजून किती काळ पाणी मिळणार नाही, याबाबत निश्चिती नसल्याने ग्रामपंचायतीने प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Fear of production due to water scarcity; 8 plumbing jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.