गावकऱ्यांची घाबरगुंडी; बिबट्या बिनधास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:00 PM2017-07-18T23:00:25+5:302017-07-18T23:28:45+5:30

गावकऱ्यांची घाबरगुंडी; बिबट्या बिनधास्त!

Fear of the villagers; Leopard bitch! | गावकऱ्यांची घाबरगुंडी; बिबट्या बिनधास्त!

गावकऱ्यांची घाबरगुंडी; बिबट्या बिनधास्त!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड/मलकापूर : वाठार-जुजारवाडी, ता. कऱ्हाड परीसरात मादीसह दोन बछड्यांचा वावर असून मंगळवारी सकाळी बिबट्याने थेट लोकवस्तीकडेच आपला मोर्चा वळवला. ग्रामस्थांसमोर रस्ता ओलांडून तो सुरूवातीला झाडीत गेला. आणि काही वेळातच झाडीतून बाहेर येऊन त्याने एका बंगल्याशेजारी ठाण मांडले. अवघ्या काही फुटांवर बिनधास्त वावरणाऱ्या बिबट्याला पाहुन ग्रामस्थांचे धाबे दणाणले.
दरम्यान, मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या लोकवस्तीत वावरू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराला वेढा दिला. मात्र, बिबट्या सर्वांसमोरून बेधडक वावरत असल्याचे चित्र त्याठिकाणी पहायला मिळाले.
वाठार व जुजारवाडी येथे गत दोन दिवसापासून मादी बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांचे शेतकऱ्यांना दर्शन होत आहे. ऊसाच्या शेतात, कधी झाडावर अनेकांना बिबट्याची बछडी दिसून आली. जुजारवाडी येथील माने वस्तीवर सोमवारी सकाळपासून वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. सोमवारी रात्री माळावरच्या वस्तीवरील अधिकराव पाटील यांच्या मालकीचा कुत्रा बिबट्याने फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी भिती पसरली. त्यातच मंगळवारी सकाळी बिबट्या लोकवस्तीतच खुलेआम वावरताना दिसला. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक बिबट्याने सर्वांसमोरून रस्ता ओलांडला. पलिकडील झाडीत जाऊन तो पसार झाला. अचानक बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांची भितीने गाळण उडाली. काहीजण तेथून सुरक्षित ठिकाणी धावले. तर काहींनी घरांचे दरवाजेच बंद करून घेतले. काही वेळानंतर बिबट्या एका बंगल्यानजीक झाडीतून बाहेर आला. त्याठिकाणीच झाडाखाली त्याने ठाण मांडले. पंधरा ते वीस मिनीटे तो त्याठिकाणी थांबून होता. त्यामुळे ग्रामस्थांमधील भिती आणखीनच वाढली. काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.
बिबट्या स्वत:हून कधीही हल्ला करीत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला हुसकावण्याचा किंवा तो दिसताच धावपळ करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यान, रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या लोकवस्तीत आला. रस्त्यावरून तो बिनधास्त वावरत
होता. हा प्रकार पाहून ग्रामस्थ आणखीनच भयभीत झाले. पाचशेहून जास्त ग्रामस्थ संबंधित ठिकाणी जमले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने त्याठिकाणी बोलाऊन घेतले. वन विभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत वाठार व जुजारवाडी येथे गस्त घालत होते.
दरम्यान, बिबट्याच्या भितीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. गत आठवड्यात परीसरात जनावरांच्या शेडमधील रेडकू बिबट्याने फस्त केले होते. तसेच कुत्र्याचीही शिकार केली होती. अनेक लोक ग्रामस्थ शिवारातील घरात राहत असल्याने रात्री अपरात्री बाहेर पडणेही भीतीचे बनले आहे.
आगाशिव डोंगरालगत वावर वाढला
आगाशिव डोंगरालगत चचेगांव, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर, विंग, आगाशिवनगरसह परिसरात अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकवेळा या गावातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून काही प्राणी फस्तही केले आहेत. काही महिन्यांपासून कासारशिरंबे गावासह सातदरा डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे.
ऊसाच्या शेतात बछड्यांसह मुक्काम
वाठार येथे माने वस्तीनजीक वाठार येथील ग्रामस्थांच्या जमीनी आहेत. याच ठिकाणी अनेकांची घरे आहेत. जवळच संजय माने यांची वस्ती आहे. रस्त्यालगत असलेल्या माने वस्तीच्या पाठीमागे ऊसाचे शेत असून ऊसाच्या शेतातच दोन बछड्यांसह बिबट्याच्या मादीने मुक्काम ठोकला आहे. आठ दिवसांपासून बिबट्यांचे अनेकवेळा दर्शन घडत आहे. वैरण काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हातातले काम आहे तसे सोडून येण्याची वेळ आली आहे.
जीव धोक्यात घालून ‘फोटोसेशन’
माने वस्तीवर बिबट्या असल्याची वार्ता परिसरात
शेतात मजूर मिळेनात
बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांना शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. अनेकांनी भितीपोटी वाठार-जुजारवाडी ते काले रस्त्यावरून ये जा करणेच बंद केले आहे. बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच या दोन बछड्यांसह बिबट्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर दिवसभर आठ ते दहा युवक त्याठिकाणी थांबून होते. त्यांना बिबट्याचे फोटो घ्यायचचे होते. फोटोसेशनसाठी होणारी ही गर्दी दिवसेंदिवस वाढत असून बिबट्याचे जवळून फोटो काढण्यासाठी व व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी युवक जीव धोक्यात घालत आहेत. अशा फोटोसेशनच्या नादात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
३ कुत्री, १ शेळी फस्त
वाठारच्या माने वस्ती परिसरात दोन बछड्यांसह मादी बिबट्याचा आठ दिवस वावर आहे. या आठ दिवसात तीन पाळीव कुत्र्यांसह एक शेळी त्यांनी फस्त केली असल्याची माहिती वाठार येथील शेतकरी सचीन पाटील यांनी दिली.

Web Title: Fear of the villagers; Leopard bitch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.