भीती वाटली, पण अंगात जिद्द जास्त होती : उर्वी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:06 PM2018-05-23T22:06:31+5:302018-05-23T22:07:03+5:30

थरार, भीती, आनंद अशा विविध भावनांच्या संमिश्र गर्दीतून जिद्दीने आणि धाडसाने वाट काढत सांगलीच्या उर्वी अनिल पाटील या चिमुकलीने तब्बल १३ हजार ८00 फुटांचे ‘सरपास’ हे हिमशिखर सर

Fearful, but the body was very strong: Urvi Patil Sarpas' | भीती वाटली, पण अंगात जिद्द जास्त होती : उर्वी पाटील

भीती वाटली, पण अंगात जिद्द जास्त होती : उर्वी पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देआता १७ हजार फुटांवरील पीन पार्वती शिखर सर करायचंय...

- अविनाश कोळी-सांगली

थरार, भीती, आनंद अशा विविध भावनांच्या संमिश्र गर्दीतून जिद्दीने आणि धाडसाने वाट काढत सांगलीच्या उर्वी अनिल पाटील या चिमुकलीने तब्बल १३ हजार ८00 फुटांचे ‘सरपास’ हे हिमशिखर सर करून वयाच्या केवळ दहाव्यावर्षी विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेकिंगच्या टीममध्ये प्रवेश करण्यापासून शिखरावरील आनंदोत्सव साजरा करेपर्यंत अनेक अडचणींच्या खाचखळग्यातून उर्वीने प्रवास केला. तिला या प्रवासादरम्यान आलेले अनुभव, त्यासाठी तिने केलेली पूर्वतयारी, मिळालेले पाठबळ याबाबत तिने ‘लोकमत’शी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : अतिथंडीच्या हिमाचल प्रदेशातील सरपास शिखर सर करताना तुला मनात भीती नाही वाटली?
उत्तर : ट्रेकिंगवर जाताना किंवा शिखर सर करताना भीती जाणवली नाही, मात्र जेव्हा बर्फ वितळत होता आणि पाय रोवून पुढे जाणे कठीण जात होते, तेव्हा मनात भीती वाटू लागली. तरीही शिखर सर करण्याची जिद्द मनात घट्ट होती. त्यामुळे भीतीवर मात केली. बराच पल्ला गाठल्यानंतर जेव्हा खाली पाहिले, तेव्हाचा प्रसंगही थरारक होता.

प्रश्न : तू इतकी लहान असताना तुला प्रवेश दिला कसा आणि तुझ्यासोबत ट्रेकिंगवर असलेल्या सहकाऱ्यांना काय वाटत होते?
उत्तर : हो, जेव्हा ट्रेकिंगची पूर्वतयारी सुरू झाली, तेव्हा कॅम्पमध्ये मला पाहून तिथल्या प्रमुखाने सर्वांना विचारले, ही मुलगी इथे आलीच कशी? तेव्हा वाटले की आता बहुतेक आपल्याला पुढे जाता येणार नाही. तरीही मी आत्मविश्वासाने त्यांच्यासमोर उभी होते. अखेर माझी तयारी, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे प्रवेश मिळाला आणि ट्रेकिंगच्या अद्भूत प्रवासाला सुरुवात झाली. अनेकांना काळजी वाटत होती, पण प्रवास सुरू झाला की प्रत्येकाने दुसºयाची नव्हे, स्वत:ची काळजी घ्यायची असते. त्यामुळे त्यानंतर मी माझी काळजी घेत पुढे जात होते. बाबा माझ्यासोबत असल्याने आधार वाटत होता.

प्रश्न : सोबत तुझे बाबा नसते तर शिखर सर झाले असते?
उत्तर : हो नक्कीच झाले असते, पण थोडा वेळ लागला असता. बाबा माझी काळजी घेत होते. जेव्हा तापमान उणे आठ अंशाखाली जात होते, तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर दोन गोधडी टाकून मला आधार दिला. मी कधीच तोंडावर पांघरुण घेत नसे, पण बाबांनी तेव्हा जबरदस्तीने मला पूर्ण झाकून टाकले. कारण, तापमानाशी मुकाबला करण्याशिवाय त्यावेळी पर्याय नव्हता. तरीही मला आत्मविश्वास वाटतो की, हे शिखर मी कोणत्याही परिस्थितीत सर करू शकले असते. या आत्मविश्वासामुळे आणि इतक्या दिवसांच्या पूर्वतयारीमुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. शिखर सर केल्यानंतरचा आनंदही फार वेगळा होता.

प्रश्न : काय पूर्वतयारी केली होती आणि सर्वात जास्त अडचण तुला कोणत्या गोष्टीची वाटली?
उत्तर : दररोज दोन तास समुद्रकिनारी रेतीमध्ये चालण्याचा सराव करीत होते. योगासनांचे सर्व प्रकार करीत होते. त्यासाठी पहाटे लवकर उठावे लागत असे. आठ तास चालण्याचा सरावही केला. चालण्याची क्षमता वाढविल्यामुळे ट्रेकिंगमध्ये त्याचा फायदा झाला. तरीही सरळ चालणे आणि ट्रेकिंग करणे यात खूप फरक असतो. त्यामुळे माझे पाय दुखायचे. त्यावेळी बाबा आणि मी एकमेकांच्या पायाला तेल लावून मॉलीश करीत असे. अशा अनेक अडचणी आल्या. सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मासा. माझ्या रोजच्या आहारात मासा असतो. मासे, चिकन याशिवाय जेवणाचा विचार मला करवतच नाही. इतके मला हे पदार्थ आवडतात. ट्रेकिंगला या गोष्टींवर निर्बंध असतात. त्यामुळे मासे खाण्याची खूप इच्छा ट्रेकिंग करताना होत होती, पण जवळ असलेले पदार्थ खाऊनच इच्छा मारली.

प्रश्न : आता तुझे पुढचे उद्दिष्ट काय असणार आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेशातीलच पीन पार्वती हा १७ हजार ४५७ फुटांवरील पर्वत सर करण्याची इच्छा आहे. हा पर्वत कधी सर करायचा, त्यासाठी काय पूर्वतयारी करायची याबाबत कोणताही विचार सध्या केलेला नाही. पण उद्दिष्ट ठरविले आहे. नृत्यात, अवकाश संशोधन क्षेत्रातही मला करिअर करायचे आहे. यापैकी भरतनाट्यम्चे शिक्षण सुरू झाले आहे.
                                                                                                             

Web Title: Fearful, but the body was very strong: Urvi Patil Sarpas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली