Sangli: काकाचीवाडीत महिला ग्रामपंचायत सदस्याने संपवले जीवन, घराशेजारील विहिरीत घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 04:52 PM2024-01-22T16:52:31+5:302024-01-22T16:53:30+5:30
नेमके कारण अद्याप अस्पष्ट
बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत सदस्या स्वाती संदीप ठोके (वय ३०) यांनी घराशेजारील विहिरीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आष्टा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाती ठोके या दि. १९ रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती संदीप ठोके यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर रविवारी दि. २० रोजी सकाळी ९:३० वाजता राहत्या घरा शेजारी असलेल्या विहिरीत स्वाती यांचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिस पाटील देवानंद ठाकूर यांनी आष्टा पोलिसांना प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.
स्वाती यांना शिवराज नावाचा १२ वर्षांचा मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे शिवाय ग्रामपंचायत सदस्याने आत्महात्या का केली, यावर गावात उलटसुलट चर्चा चालू होती.