Sangli News: प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोघा शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:53 PM2023-01-27T15:53:27+5:302023-01-27T15:54:28+5:30

जत : खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा ...

Female teacher molested by two teachers on Republic Day, case registered in jat sangli | Sangli News: प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोघा शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

Sangli News: प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोघा शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

googlenewsNext

जत : खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी खोजानवाडी (ता. जत) येथे घडली.

संबंधित महिला शिक्षिका ही जिल्हा परिषदेत गेली २५ वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षापासून त्याच्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, खोजनवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापकचा कार्यभार आहे. याठिकाणी बाळू तुकाराम साळुंखे, अर्जुन महादेव माळी, उमेश कोळी, दिनेश चव्हाण असे शिक्षक काम पाहत आहेत. 

काल, २६ जानेवारी रोजी शाळेतील झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपवून संबंधित महिला शिक्षिका कार्यालयात एकट्या बसल्या होत्या. यावेळी शिक्षक बाळू सांळुखे व अर्जुन माळी त्यांच्या कार्यालयात गेले. दरम्यान, बाळु सांळुखे यांनी मला तुम्ही मुख्याध्यापकचा चार्ज का देत नाही, मला मुख्याध्यापकाचा चार्ज देणेबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडून पत्र दिले आहे, तरी सुध्दा तुम्ही मला सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचा चार्ज देत नाही, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. तर अर्जुन माळी यांनी ही बाई कसा चार्ज देत नाही ते अपण बघून घेवू असे म्हणून शिवीगाळी दमदाटी केल्याचे संबंधित महिला शिक्षकाने फिर्यादीत म्हटले आहे. 

याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात बाळू साळुंखे व अर्जुन माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लवटे करीत आहेत.

Web Title: Female teacher molested by two teachers on Republic Day, case registered in jat sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.