शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:43+5:302021-09-09T04:31:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे ...

Fever of 'e-crop' inspection on farmers' heads ... | शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप...

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शासनाची ‘ई-पीक’ पाहणी मोहीम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रकान्यात भरावे, त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सबमिट केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीही जिल्ह्यात वीस हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शासनाने १५ ऑगस्टपासून ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ ही ‘ई-पीक’ पाहणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पिकासंदर्भातील माहिती ॲपवर कशी भरावी, याबाबतची माहिती तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात देणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यात पाच लाख ३८ हजार शेतकरी असून, बहुतांश शेतकरी शेतात जाऊन ‘ऑन द स्पॉट’ पीक पाहणी नोंदवत आहेत. या शेतकऱ्यांना माहिती भरताना अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ही मोहीम शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.

चौकट

कोणत्या तालुक्यात किती नोंदणी?

तालुका नोंदणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह

आटपाडी २८७३ २७२७ १४६

कडेगाव २४६१ २२७६ १८६

क.महांकाळ ८८० ८०७ ७३

खानापूर ३५०० ३३०५ १९५

जत १२१८ ११३७ ८१

तासगाव १९०२ १७७६ १२६

पलूस १४५४ १३४३ १११

मिरज १७०० १५६२ १३८

वाळवा ३२१२ २९९९ २१३

शिराळा १३०३ १२०१ १०२

एकूण २०५०३ १९१३३ १३७०

चौकट

एकूण नोंदणी : २०५०३

ॲक्टिव्ह : १९१३३

इनॲक्टिव्ह : १३७०

चौकट

हाताळणी कोण शिकवणार?

‘ई-पीक’ पाहणी ही शासनाची संकल्पना शेतकऱ्यांच्यादृष्टीने चांगली आहे. पण ही योजना राबवताना शेतकरी अशिक्षित असून, त्यांना मोबाईलमधील ॲप कसे हाताळावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- तुकाराम पाटील, शेतकरी.

कोट

माझे शिक्षण काहीच नाही. मुलांचेही जेमतेम शिक्षण झाले असून, ‘ई-पीक’ पाहणीचे ॲप कसे वापरावे, हे आम्हाला काहीच माहीत नाही. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले तरच नवीन ॲपचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

- शहाजी शिंदे, शेतकरी.

कोट

‘ई-पीक’ पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. अडचण असेल त्याठिकाणी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून, पंधरा दिवसात २१ हजार शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ नोंदणी केली आहे.

- मनोज वेताळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Web Title: Fever of 'e-crop' inspection on farmers' heads ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.