सांगलीत प्रार्थना स्थळाच्या वादातून मारामारी

By शीतल पाटील | Published: February 27, 2023 10:21 PM2023-02-27T22:21:48+5:302023-02-27T22:22:21+5:30

परस्परविरोधी तक्रारी ; सहा जखमी; १४ जणांवर गुन्हा

fight over disputed over place of worship in sangli | सांगलीत प्रार्थना स्थळाच्या वादातून मारामारी

सांगलीत प्रार्थना स्थळाच्या वादातून मारामारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : कुपवाड रोडवरील एका भागात प्रार्थना स्थळाच्या वादातून शनिवारी रात्री मारामारीचा प्रकार घडला. काठी आणि लोखंडी पाईपने दोन्ही बाजूंनी केलेल्या हल्ल्यात सहाजण जखमी झाले आहेत. दोघांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या दिल्या असून संजयनगर पोलिसांनी ४ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

रामचंद्र यशवंत कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रार्थनास्थळाबाबत दाखल केलेला दावा आणि त्या ठिकाणी ये जा करणाऱ्यांच्या बाबतीत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरुन संशयीत यासीन इकबाल नदाफ, हुजेफ शकील चौधरी, साकीब रफीक चौधरी, इरफान नदाफ, आस्लम मुजावर, आयशा चौधरी, शायरा चौधरी, अंजुम चौधरी, शकील चौधरी, रफीक चौधरी (सर्व रा. सांगली) आदींनी काठ्या आणि लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात रामचंद्र कोष्टी, श्रीकांत कोष्टी आणि सुनिता कोष्टी जखमी झाले आहेत.

तर यासीन इकबाल नदाफ यांनीही कोष्टी यांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास यासीन हे हुजेक चौधरी आणि साकीत चौधरी या मित्रासोबत उभे होते. त्यावेळी संशयित श्रीकांत कोष्टी हा यासीन यांच्याजवळ आला. त्याने जाब विचारला. त्यानंतर धक्काबुक्की करुन यासीनला खाली पाडले. त्यानंतर घरातून लोखंडी पाईप आणून त्यांच्या पाठीवर, उजव्या गुडघ्यावर हल्ला केला. त्या दोघांत मारामारी सुरु झाल्याने हुजेफ आणि साकेब चौधरी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत कोष्टी याचे वडील रामचंद्र, त्याची आई सुनिता आणि पत्नी स्वप्नाली आदींनी तिघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संजयनगर पोलिसांनी या मारामारीची गंभीर दखल घेऊन संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fight over disputed over place of worship in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.