बागणी येथे दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:56+5:302021-04-26T04:24:56+5:30
मारामारीप्रकरणी अतुल मलमे (वय ३४), संभाजी मलमे (६०), अतिश मलमे (२२), दीपक मलमे (४५), संदीप विलास मलमे (३३), ...
मारामारीप्रकरणी अतुल मलमे (वय ३४), संभाजी मलमे (६०), अतिश मलमे (२२), दीपक मलमे (४५), संदीप विलास मलमे (३३), सर्जेराव मलमे (३०), राजू मलमे (३०), ऋतिष मलमे (२०), सागर तानाजी मलमे (३४), एकनाथ विजय मलमे (३२), तानाजी दादू मलमे (६०), दिनकर राजाराम मलमे (६२), शिवनाथ विजय मलमे (३०), विजय दादू मलमे (५८) आणि मारुती कृष्णा मलमे (२५, सर्व रा. बामणी) या १५ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद मलमे यांचा भाऊ अविनाश मलमे याने त्यांच्याच नात्यातील किरण मलमे याचा फोटो वाढदिवसादिवशी फेसबुक स्टेटसवर लावला होता. मात्र, विकी मलमे याच्या खुनाचा राग मनात धरून अतुल, संभाजी, अतिश व दीपक मलमे यांनी कुऱ्हाडी व कोयत्याने प्रमोद मलमे यांच्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. संदीप, सर्जेराव व राजू मलमे यांच्या सांगण्याने दगडाने मारहाण करून जखमी केल्याची प्रमोद मलमे यांची तक्रार आहे. अतुल मलमे यांनी त्यांचा चुलत भाऊ विकी मलमे याचा खून झाला असून, चुलत भावाच्या खून प्रकरणातील आरोपी किरणचा फोटो अविनाश मलमे याने फेसबुकवर टाकला होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता गावात चौकात थांबले असता त्यांनी अविनाश याला चुलत भावाच्या खून प्रकरणातील आरोपीचा फोटो फेसबुकवर का टाकलास, असा जाब विचारल्याने ऋतिष, सागर, एकनाथ, तानाजी, दिनकर, शिवनाथ, विजय व मारुती मलमे या सर्वांनी तू कोण विचारणार, असे म्हणत तलवार, चाकू व दगडाने मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी अतुल यांच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही गटांच्या १५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व बेकायदा हत्यार बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सशस्त्र हाणामारीच्या प्रकारामुळे बामणी गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.