विलगीकरणात असतानाही गावात फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:20+5:302021-07-18T04:19:20+5:30
नरवाड : गृह विलगीकरणात असतानाही गावात भटकंती करणाऱ्या काेराेनाबाधितांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी ...
नरवाड : गृह विलगीकरणात असतानाही गावात भटकंती करणाऱ्या काेराेनाबाधितांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी नरवाड (ता. मिरज) येथील आढावा बैठकीत दिले.
चाैधरी म्हणाले,, जिल्हात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नागरिकांनी दक्षता घ्यावी. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच डॉ. रामगौंडा पाटील यांनी काेराेनाबाबत गावात राबविलेल्या उपाययाेजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर शिंदे यांनी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाबाबत दुजाभाव सुरू असल्याचा आराेप करीत चौकशीची मागणी केली. कार्यक्रमास सरपंच राणी नागरगोजे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार बी. एस. कुंभार, गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, नोडल अधिकारी शीतल उपाध्ये, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे, तलाठी आर. आर. कारंडे, पोलीस-पाटील दीपक कांबळे, अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.