आष्ट्यात रस्ता वहिवाटीच्या कारणावरून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:45+5:302021-03-22T04:24:45+5:30
आष्टा : येथील खोत मळा अमृतवाडी येथील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून वर्षा शिवाजी पाटील या वकील महिलेसह रवींद्र जालिंदर चोरमुले ...
आष्टा : येथील खोत मळा अमृतवाडी येथील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून वर्षा शिवाजी पाटील या वकील महिलेसह रवींद्र जालिंदर चोरमुले (दोघे, रा. आष्टा) यांनी आष्टा पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रवींद्र जालिंदर चोरमुले (वय ३०) व बाळासाहेब किसन शेळके (५४), शिवाजी बापूसाहेब पाटील (४९) व धीरज रामचंद्र पाटील (२०) यांना आष्टा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींना इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना बुधवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
खोत मळा अमृतवाडी येथील शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून पाटील व चोरमुले कुटुंबीयांत वाद सुरू आहे. या वादातूनच शनिवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान तलवार, काठ्या, कोयता, कुदळीच्या दांड्याने जालिंदर चोरमुले, रवींद्र चोरमुले, कौशल्या चोरमुले, ज्योती चोरमुले, मंगल नरूटे, अंकुश चोरमुले, बाळासाहेब शेळके यांची दोन मुले संग्राम व किरण यांच्यासह २५ लोकांनी मारहाण केल्याची फिर्याद वर्षा शिवाजी पाटील यांनी दिली आहे.
तर रवींद्र चोरमुले यांनी दिलेल्या फिर्यादीत शिवाजी पाटील, तानाजी पाटील, धीरज पाटील ,संभाजी पाटील, राजाक्का पाटील, वर्षा पाटील, शुभांगी पाटील, धनश्री पाटील, कल्पना पाटील (सर्व, रा. खोत मळा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कुऱ्हाड व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद्ध करीत आहे.