कोल्हापूरप्रमाणे सांगलीत ‘लोकजत्रा’ भरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:52+5:302020-12-11T04:54:52+5:30
सांगली : प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कोल्हापूरप्रमाणे सांगलीतही ‘लोकजत्रे’चे आयोजन करावे, अशी मागणी गुंठेवारी संघर्ष समितीचे नेते चंदन चव्हाण ...
सांगली : प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कोल्हापूरप्रमाणे सांगलीतही ‘लोकजत्रे’चे आयोजन करावे, अशी मागणी गुंठेवारी संघर्ष समितीचे नेते चंदन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांची वेगवेगळ्या स्तरावर प्रकरणे व असंख्य कामे प्रलंबित आहेत. प्रचलित कायदे, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रक याबाबत असलेली अनभिज्ञता यामुळे प्रकरणे प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. शासनाच्या कामात लोकाभिमुखता, गतिमानता, पारदर्शीपणा, सुसूत्रता, सुलभता यावी, लोकांचे प्रश्न निकाली निघावेत, यासाठी ‘महाराजस्व’ अभियान सुरू आहे .
जिल्ह्यातील जनतेचे महसूल विभागाकडील प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत म्हणून या अभियानांतर्गत कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यात ‘महसूल लोक जत्रा’ भरवावी.
महाराजस्व अभियानात महसूल जमीन, महसूल कूळकायदा, गावठाण, पुनर्वसन, गौण खनिज, पुरवठा, रोजगार हमी, सामाजिक अर्थसहाय्य, भूमिअभिलेख, समाजकल्याण, सात-बारा नोंदी आदी विभागांतील ११६ विषयांचा समावेश आहे. या मोहिमेत प्रत्येक कामाची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, महसूल सहायक, मंडल अधिकारी, अव्वल कारकुन, भू-करमाफक, नायब तहसीलदार आदींवर निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.