अखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:37 PM2021-03-01T12:37:08+5:302021-03-01T12:39:58+5:30

petrol sangli-पेट्रोलच्या किंमतीनी सांगलीत अखेर शंभरी पार केली. सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात पॉवर पेट्रोलची १००.१८ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री सुरु झाली. साधे पेट्रोल ९७.३४ रुपयांवर पोहोचले. डिझेल ८७.०५ रुपयांनी विकले जात होते.

Finally, Patrol scored a century in Sangli! | अखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!

अखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!

Next
ठळक मुद्देअखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!पुन्हा दरवाढ ?

सांगली : पेट्रोलच्या किंमतीनी सांगलीत अखेर शंभरी पार केली. सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात पॉवर पेट्रोलची १००.१८ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री सुरु झाली. साधे पेट्रोल ९७.३४ रुपयांवर पोहोचले. डिझेल ८७.०५ रुपयांनी विकले जात होते.

गेल्या दशकभरातील या विक्रमी आणि उच्चांकी किंमती ठरल्या आहेत. राज्यभरात अन्यत्र पेट्रोलने यापूर्वीच शंभरी गाठली होती, पण सांगलीत मात्र आटोक्यात होते. साधे पेट्रोल गेले आठवडाभर ९५ रुपयांच्या आसपास घुटमळून रविवारी सकाळी ९७.३४ रुपयांवर पोहोचले.

दररोजची पंधरा ते तीस पैशांची दरवाढ पाहता येत्या आठवड्यात तेदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत पॉवर पेट्रोलची विक्री पंप चालकांसाठी मोठीच डोकेदुखी ठरली आहे. ते खपविण्यासाठी तेल कंपन्यांकडून दबाव येत आहे, मात्र साध्या पेट्रोलच्या किंमतीचा भडका उडत असताना पॉवर पेट्रोल ग्राहकाला कसे पचनी पडेल? हा प्रश्न पंप चालकांपुढे आहे.

इंधनाच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकत आहेत. डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचे भाडे यापूर्वीच वाढले आहे, आता रिक्षा संघटनाही भाडेवाढीच्या पवित्र्यात आहेत. खासगी लक्झरी वाहतुकदारही जादा प्रवासी भाडे आकारणी करत आहेत. एसटीने अद्याप भाडेवाढ केलेली नसल्याने वडाप व्यावसायिकांनी अद्याप संयम राखला आहे.

पुन्हा दरवाढ ?

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखांना किंमतीचा आढावा घेतात. त्यानुसार सोमवारी (दि. १) इंधनाच्या किंमतीत पुन्हा काहीशी दरवाढ होऊ शकते. गॅसचे दर तीनच दिवसांपूर्वी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, त्यामुळे ते तुर्त स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

 

 

Web Title: Finally, Patrol scored a century in Sangli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.