अखेर शिरगाववासियांना दिलासा मिळणार; केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 03:48 PM2021-04-22T15:48:18+5:302021-04-22T15:49:10+5:30

Shirgaon : केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

Finally, the people of Shirgaon will get relief; 33.87 crore sanctioned for bridges under Central Road Fund Scheme | अखेर शिरगाववासियांना दिलासा मिळणार; केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर

अखेर शिरगाववासियांना दिलासा मिळणार; केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर

Next
ठळक मुद्देकृष्णा नदीला पूर आल्यानंतर शिरगाववासियांचा तालुक्याशी संपर्क तुटत होता.

इस्लामपूर - वाळवा : अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची शिरगाववासियांची कृष्णा नदीवरील पुलाची मागणी पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण होणार आहे.

इस्लामपूर - वाळवा मतदारसंघातील शिरगाव हे एकमेव गाव कृष्णा नदीच्या पल्याड आहे. पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्यादृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांच्या पुलाच्या मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा केला आणि आता केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. 

दरम्यान, कृष्णा नदीला पूर आल्यानंतर शिरगाववासियांचा तालुक्याशी संपर्क तुटत होता. पूरपरिस्थितीत येणाऱ्या अडचणी शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या. शिवाय, सांगली जिल्ह्यात महापूर आला होता, तेव्हा स्वत: जयंत पाटील यांना शिरगाववासियांपर्यंत मदत पोहोचवताना अडचणी आल्या होत्या. 

महापुराच्यावेळी आलेल्या कटू आठवणी उराशी बाळगत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता समाधानही व्यक्त केले आहे. तसेच, शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. याचबरोबर, केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत आष्टा - दुधगाव - कुंभोज पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही ३.९६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आष्टा - दुधगाव परिसराचा थेट कोल्हापूर जिल्ह्याशी दळणवळणासाठी संबंध येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Finally, the people of Shirgaon will get relief; 33.87 crore sanctioned for bridges under Central Road Fund Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.