ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:28+5:302021-01-14T04:22:28+5:30
इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपिकता व ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अर्थपुरवठा उपलब्ध करून दिला ...
इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपिकता व ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अर्थपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्हॉलिबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.
येथील उरुण परिसरातील पाटील भजनी मंडपमध्ये राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने उच्च तंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजनेंतर्गत आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, संचालक पै. भगवानराव पाटील, जालिंदर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवा नेते संदीप पाटील उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, सध्या ३०-३२ वर्षांनी पाण्याच्या अतिवापराने क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. आपल्या जमिनीची सुधारणा करत ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन करणे गरजेचे आहे.
सुभाषराव जमदाडे यांनी ठिंबक सिंचना योजनेची माहिती दिली. ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, संजय पाटील, प्रशांत पाटील, एम. जी. पाटील, नितीन पाटील, वसंत पाटील, बाळासाहेब पाटील, युवराज पाटील, जगन्नाथ पाटील, लक्ष्मण पाटील, बाबूराव मुळीक, विजय जाधव, उत्तम माने, रणजित पाटील, पोपट पाटील उपस्थित होते. गटाधिकारी महेश कदम यांनी आभार मानले.
फोटो १३०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर शेतकरी न्यूज
ओळ : इस्लामपूर येथील शेतकरी परिसंवादामध्ये प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवान पाटील, जालिंदर कांबळे, दादासाहेब पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, सुभाषराव जमदाडे उपस्थित होते.