दुचाकीचे सायलेंसर बदलणाऱ्यांना १६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:36+5:302020-12-30T04:36:36+5:30
सांगली : दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात शहरात फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. कर्णकर्कश हॉर्न ...
सांगली : दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात शहरात फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. कर्णकर्कश हॉर्न व सायलेंसरमध्ये बदल केलेल्या नऊ वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली होती. त्या वाहने उपप्रादेशिक कार्यालयातर्फे तपासणी करण्यात आली. चार वाहनांना १६ हजार ७०० रुपयांचा दंड करण्यात आला. दुचाकीत बदल करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी दिली.
मोटार वाहन कायद्यातील नियमांचे भंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आठ बुलेटसह नऊ वाहने जप्त करण्यात आली. सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी या वाहनांची पाहणी करीत एक हजार ७०० असा दंड करण्यात आला, तर एक मॉडीफाईड वाहनाला नऊ हजार ५०० आणि साडेचार हजारांचा दंड करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.