नियम मोडणाऱ्यांकडून पावणे दोन कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:45+5:302021-05-29T04:21:45+5:30
जिल्ह्यात ५३ ठिकाणी नाकाबंदी लावून ई-पास नसलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर ५६९ केसेस करून त्यांच्याकडून सहा लाख ६ हजार ...
जिल्ह्यात ५३ ठिकाणी नाकाबंदी लावून ई-पास नसलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर ५६९ केसेस करून त्यांच्याकडून सहा लाख ६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर १५३ केसेस करून ८१ हजार २०० रुपयांचा दंड, तर विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून ९९ हजार ७११ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यासह ३३ हजार २८३ दुचाकी, तर ५ हजार ४१५ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
राज्य शासनाकडून अद्यापही कडक निर्बंध लागू असल्याने कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.
चाैकट
लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीवर बंदी असतानाही चोरून दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली आहे. त्यानुसार २०६ केसेस करून आठ लाख ८९ हजार १२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.