महिन्यात पावणे दोन कोटींच्या दंडाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:24+5:302021-05-16T04:26:24+5:30
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार ८ ...
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार ८ एप्रिलपासून शनिवारपर्यंत एक कोटी ८७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ९४३ जणांवर कारवाई करत १७ हजार ४७३, दुचाकी आणि ५ हजार ६४ चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
गेल्या सात दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू असलातरी महिनाभरापासून निर्बंध लागू आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
८ एप्रिलपासून १५ मेपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ९४३ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३२ लाख १२ हजार ६०० चा दंड वसूल करण्यात आला तसेच विनाकारण फिरणाऱ्या १७ हजार ४७३ दुचाकी तसेच ५ हजार ६४ चारचाकी जप्त करून त्यांच्याकडून ६८ लाख ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनीही त्यास सहकार्य करावे. विनाकारण बाहेर फिरू नये अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे.