वर्षभरात मास्क न लावणाऱ्या ४९ हजार जणांना ९८ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:51+5:302021-03-20T04:23:51+5:30
गेल्या वर्षीची सुरुवात कोरोनाच्या दहशतीने झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव वाढतच गेला. त्यातच केंद्र सरकारने लागू केलेेले लॉकडाऊनसह ...
गेल्या वर्षीची सुरुवात कोरोनाच्या दहशतीने झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव वाढतच गेला. त्यातच केंद्र सरकारने लागू केलेेले लॉकडाऊनसह संसर्ग रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत होती. जिल्ह्यात २३ मार्च २०२० पासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात करण्यात आली. मास्कचा वापर करणे हे कोरोनापासून बचावाचे प्रभावी माध्यम असतानाही त्याकडे नागरिकांकडून सर्रास दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजाराच्या घरात पोहोचली असताना अद्यापही मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळेच पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. त्यातून दंडाचीही वसुली केली आहे. महिनाभरापासून पुन्हा एकदा पाेलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे.
चौकट
काेरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया दाखल गुन्हे
विनामास्क ४९११५
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे १३३४
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २९७
चौकट
बिनधास्तपणा वाढतोय
वर्षभरापासून कोरोनाच्या छायेखाली जिल्हा असतानाही त्याचे कोणतेही गांभीर्य नागरिकांमध्ये दिसून येत आहे. बाजारात, गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणारे आढळत आहेत.
चौकट
महिनाभरात पुन्हा कारवाईला वेग
गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी पुन्हा कारवाईस सुरुवात केली आहे. त्यात विनामास्क फिरणाऱ्या १२ हजार ९०३ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून २५ लाख ९४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
चौकट
मंगल कार्यालये, मॉलवर नजर
जिल्ह्यातील मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे व शॉपिंग मॉलसह गर्दी होणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. याठिकाणी नियमित भेटी देऊन गर्दी आढळून आल्यास अथवा विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दोन महिन्यांत पोलिसांनी ७ हजार १४५ ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
कोट
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पोलीस कार्यरत आहेत. कोरोना रोखण्यासाठी जनतेनेही पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक.