कुपवाडमध्ये दारूची विक्री करणाऱ्याकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:51+5:302021-04-24T04:27:51+5:30
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कुपवाड पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे. शुक्रवारी दुपारी कुपवाड पोलिसांनी दोन ...
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कुपवाड पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे. शुक्रवारी दुपारी कुपवाड पोलिसांनी दोन देशी दारू दुकाने व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. संबंधिताकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देशी दारू दुकानदारांना आस्थापना बंद करून शासनाने दिलेल्या आदेशानुसार घरपोच सेवा देण्याची अट असताना शहरातील दोन्ही देशी दारू दुकाने शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून दारूची विक्री करीत असल्याचे कुपवाड पोलिसांनी सोडलेल्या ड्रोनच्या छायाचित्रांतून उघडकीस आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, युवराज पाटील, शिवानंद गव्हाणे, सतीश माने, इंद्रजित चेळकर, शिवाजी ठोकळ, विजय घस्ते, सूरज मुजावर, जुबेर इनामदार यांनी दारू दुकानावर कारवाई करून संबंधिताकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.