जाखापूर-कुंडलापूर परिसरात शाॅर्टसर्किटने आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:34+5:302020-12-30T04:36:34+5:30
कुंडलापूर व जाखापूर गावाच्या हद्दीत पवनऊर्जा प्रकल्प चालू आहेत. त्यासाठी उच्च क्षमतेच्या विद्युत वहिन्या जोडण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी ...
कुंडलापूर व जाखापूर गावाच्या हद्दीत पवनऊर्जा प्रकल्प चालू आहेत. त्यासाठी उच्च क्षमतेच्या विद्युत वहिन्या जोडण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक एका विद्युत वाहिनीमधून शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने आग लागली. बघता बघता आग वेगाने सर्वत्र पसरली. ही बाब स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये कुंडलापूर येथील युवक, शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचाही मोठा सहभाग होता. त्यांनीही जीव धोक्यात घालून भर उन्हात आग आटोक्यात आणली. तीन तासांच्या अथक् प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत सुमारे १२७ एकर क्षेत्रातील पिके, गवत, गवताच्या गंज्या, जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी एस. डी. हांगे, ग्रामसेवक माळी व अरुण झांबरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.