विटामध्ये फर्निचर शोरुमला भीषण आग; तब्बल अडीच कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 09:55 AM2020-06-13T09:55:19+5:302020-06-13T10:07:20+5:30
विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरूम च्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता.
विटा (सांगली) - विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या भव्य श्वेता स्टील फर्निचर शोरुम दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागून सुमारे दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले. या आगीत फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरुममधील किमती साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विटा येथे घडली.
विटा येथील सुप्रसिद्ध उद्योजक कुमार पवार यांचे कराड रस्त्यालगत श्वेता स्टील फर्निचर नावाचे भव्य शोरुम आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी या शोरुमचे नूतनीकरण करून घेतले होते. विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरुमच्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता.
शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केले. मध्यरात्री वारा असल्याने ही आग बाजूलाच असलेल्या फर्निचर शोरूममध्ये गेली. त्यावेळी या भीषण आगीने संपूर्ण शोरुमला वेढा टाकला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर सांगली महानगरपालिका, विटा, तासगाव, आष्टा नगरपालिका, सोनहीरा, क्रांती साखर कारखाना यासह सुमारे आठ ते दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
आग इतकी भीषण होती की, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला समारे सहा ते सात तासाचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर आग काही अंशी आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत शोरुममधील सोफासेट, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड, लोखंडी व लाकडी कपाट यासह अन्य किमती साहित्य व नूतनीकरण केलेले भव्य शोरूम जळून खाक झाले. त्याच्या बाजूला भांडी दुकान आहे. हे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ
CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया