सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग प्रतिबंधक प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:26+5:302021-04-30T04:33:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका अग्निशमन विभागाकडून बुधवारी शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके घेण्यात आली. आयुक्त नितीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका अग्निशमन विभागाकडून बुधवारी शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके घेण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.
राज्यभरात रुग्णालयांना आगीच्या दुर्घटना वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालयात आग लागल्यास त्यावर तात्काळ कसे नियंत्रण आणावे याबाबत अग्निशमन विभागाकडून प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. यावेळी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग विझवण्याचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये शिडीच्या साहाय्याने अग्निशामक जवान तसेच सुरक्षा बलाच्या जवानांनी पाइप हातात घेत क्षणात वर चढून गेले. यावेळी रुग्णालय स्टाफ आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सर्व वैद्यकीय व सुरक्षा कर्मचारी यांना अग्निसुरक्षा यंत्रणेचा वापर कसा करावा, आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाय आहेत, याची माहिती दिली. यावेळी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता प्रकाश गुरव, अधीक्षक नंदकिशोर गायकवाड, उपवैद्यकीय अधीक्षक मनोज पवार, सतीश अष्टेकर, सीमा माने, संजय खाडे, वसंतराव इंगळे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी डी. डी. दडस, मुकादम मुनिर पठाण उपस्थित होते.