रामपूर येथे आगीत डाळिंब बागेचे सात लखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:46+5:302021-03-19T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : रामपूर (ता. जत) येथील अर्चना मारुती मलमे (वय ४०) यांच्या डाळिंब बागेला शॉर्टसर्किटने आग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : रामपूर (ता. जत) येथील अर्चना मारुती मलमे (वय ४०) यांच्या डाळिंब बागेला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे सहा लाख ९० हजार ३६० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तलाठी रवींद्र घाडगे व कोतवाल सुभाष कोळी यांनी पंचनामा करून शासनाला मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे.
रामपूर येथील सर्व्हे नंबर ४६ मध्ये अर्चना मलमे यांनी पाच वर्षांपूर्वी डाळिंब बागेची लागण केली होती. या बागेत डाळिंबाची तयार ४४५ झाडे होती. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डाळिंब बागेवरून गेलेल्या विद्युत वाहिनीत शॉर्टसर्किट झाले. त्याची ठिणगी डाळिंब बागेतील गवतावर पडून अचानक आग लागली. या आगीत बागेतील ४४५ झाडे, ८० फूट सबमर्सिबल केबल, ठिंबक पाइपलाइन दोन बंडल, मेन पाइपलाइन, पीव्हीसी पाइप व चार व्हॉल असे साहित्य जळून खाक झाले.
परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात आली नाही. यात सहा लाख ९० हजार ३६० रुपये इतके नुकसान झाले आहे.