अगोदर सामान्य शिवसैनिकांशी लढा, मग आदित्य ठाकरेंना आव्हान द्या; हर्षद कदम यांचा शंभुराज देसाईंवर पलटवार

By प्रमोद सुकरे | Published: February 4, 2023 03:03 PM2023-02-04T15:03:20+5:302023-02-04T15:41:03+5:30

 हर्षद कदम म्हणाले मंत्री देसाई हे संधी मिळेल तेव्हा ठाकरे कुटुंबावर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात.

First fight ordinary Shiv Sainiks, then challenge Aditya Thackeray; Harshad Kadam's counter attack on Shambhuraj Desai | अगोदर सामान्य शिवसैनिकांशी लढा, मग आदित्य ठाकरेंना आव्हान द्या; हर्षद कदम यांचा शंभुराज देसाईंवर पलटवार

अगोदर सामान्य शिवसैनिकांशी लढा, मग आदित्य ठाकरेंना आव्हान द्या; हर्षद कदम यांचा शंभुराज देसाईंवर पलटवार

googlenewsNext

कराड- जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिलेले आव्हान ही हास्यास्पद बाब आहे. खरंतर देसाईंनी आदित्य ठाकरेंना पाटण विधानसभा मतदारसंघात येऊन लढण्याचे आव्हान देण्यापेक्षा अगोदर त्यांनी आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाबरोबर येथून लढून निवडून येऊन दाखवावे मगच आदित्य ठाकरे यांना आव्हान द्यावे असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

 हर्षद कदम म्हणाले मंत्री देसाई हे संधी मिळेल तेव्हा ठाकरे कुटुंबावर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना संधी देण्यासाठी सुनील शिंदे यांनी आपला हक्काचा मतदारसंघ सोडून आपली पक्षनिष्ठ दाखवून दिली होती. परंतु देसाई आणि पक्षनिष्ठा यांचा कधीही संबंध आलेला दिसलेला नाही. असेही ते म्हणाले.

तुम्ही ठाकरे  कुटुंबावर टीका करताय पण तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच आदि्य ठाकरे यांची आपल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये तुम्ही प्रचार सभा आयोजित केली होती. त्यांनी केलेल्या प्रचारामुळेच आपण यशापर्यंत पोहोचू शकला आहात याचा सोयीस्कर विसर तुम्हाला पडलेला दिसतोय. तो पडून देऊ नका.ठाकरे परिवारावर टिका करण्याची आपली योग्यता नाही हे लक्षात ठेवा असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: First fight ordinary Shiv Sainiks, then challenge Aditya Thackeray; Harshad Kadam's counter attack on Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.