‘हुतात्मा’तर्फे तोडणी वाहतूकचा पहिला हप्ता अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:02+5:302021-06-16T04:37:02+5:30
वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याच्या वतीने सन २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करार केलेल्या वाहनधारकांना पहिला हप्ता अदा ...
वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याच्या वतीने सन २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करार केलेल्या वाहनधारकांना पहिला हप्ता अदा करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष बाबूराव बोरगांवकर यांच्या हस्ते मंगळवारी याचे वाटप झाले, अशी माहिती कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
ते म्हणाले की, यावर्षी कारखाना सात लाख टन उसाचे गळीत करणार आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या ऊस नोंदणीचे काम ३० जून रोजी पूर्ण होत आहे. यासाठी १३ मेपासून तोडणी वाहतूक करार सुरू केले आहेत. २५० मोठे ट्रॅक्टर, २५० अंगद, ६०० बैलगाड्यांचे करार सुरू केले आहेत.
यातील करार केलेल्या वाहनधारकांना मोठ्या वाहनांसाठी ३.५ लाख, अंगद १.५ लाख व बैलजोडीसाठी ७० हजार रुपये याप्रमाणे पहिला हप्ता देण्यात आला आहे.
यावेळी संदीप पाटील, भगवान अडीसरे, पी. ए. चव्हाण, एस. बी. बोराटे, बी. एस. माने उपस्थित होते.