सार्थक देशपांडे, पवन रजपूत यांच्या उपकरणांना प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:55+5:302021-03-04T04:48:55+5:30
सांगली : आकार फाऊंडेशनतर्फे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. ४२ छोट्या वैज्ञानिकांनी त्यात भाग घेतला. सार्थक देशपांडे ...
सांगली : आकार फाऊंडेशनतर्फे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. ४२ छोट्या वैज्ञानिकांनी त्यात भाग घेतला. सार्थक देशपांडे व पवन रजपूत यांच्या उपकरणांना प्रथम क्रमांक मिळाला.
सहावी ते आठवी गटात देशपांडे (मिरची कटिंग मशीन) याच्यासह इंद्रसिंग मुळे (फूट सॅनिटायझर मशीन), व्यंकटेश सिद्धे (किडनीचे मॉडेल व कार्य) यांनी यश मिळविले. नववी ते बारावी गटात रजपूत (हायड्राॅलिक बुलडोझर) याच्यासह कलिका परिडा (गणिती जादू) व उदय सुतार (सोलर फवारणी पंप) यांनी यश मिळविले. चित्रकला स्पर्धेचा निकाल असा : सहावी ते आठवी - हर्षदा परिडा, जान्हवी सातपुते, निरंजन भोसले. नववी ते बारावी - आकांक्षा काशीद, नेहा शिंदे, अंजली रेड्डी. उत्तेजनार्थ - राधिका मलकानावर, साक्षी चव्हाण. सर्व उपकरणे टाकाऊ वस्तूंपासून कमीत कमी खर्चात बनविली होती. फाऊंडेशनतर्फे वीस वर्षांपासून मानसिक आरोग्य विषयावर कार्यरत आहे. कोरोनामुळे विज्ञान स्पर्धा सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन झाल्या. विद्यार्थ्यांनी वॉटर डिस्पेन्सर, हायड्रॉलिक जॅक, मिरची कटिंग यंत्र, गणिती जादू, सॅनिटायझर मशीन, किडनीचे कार्य, श्वसन यंत्रणेचे कार्य, वायू प्रदूषण रोखणारी यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रकाशाचे विकिरण, सोलर चार्जिंग फवारणी पंप, बलून कार, हायड्रॉलिक बुलडोझर, पाण्यापासून वीजनिर्मिती आदी प्रकल्प सादर केले. स्पर्धांचे परीक्षण प्रा. सविता जाधव व प्रा. गायत्री श्रीनिवास, नेहा चौंदीकर, गणपती माळी यांनी केले. उज्वला परांजपे व सहकाऱ्यांनी संयोजन केले.