अंकलखाेपमध्ये पाच दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:11+5:302021-05-04T04:11:11+5:30
काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात प्रांतधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, ...
काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात प्रांतधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक जगताप प्रमुख उपस्थित होते.
सरपंच अनिल विभुते यांनी गावातील रुग्ण व आरोग्य व्यवस्था याबाबत माहिती दिली. प्रांतधिकारी गणेश मरकड म्हणाले, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनी रुग्ण व कुटुंबातील सदस्यांची चौकशी नियमित करावी. गावात रुग्णवाहिका व ऑक्सिजन व्यवस्था करा. गावात विनाकारण व मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. प्रसंगी गुन्हा दाखल करा. पण कोणालाही पाठीशी घालू नका.
उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे म्हणाल्या, रुग्णसंख्या कमी आहे म्हणून गाफील राहू नका. प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना शोधून लवकरच उपचार केले, तर पुढील धोका कमी होईल. यंत्रणांवरील ताण व नागरिकांची भीती कमी होईल.
यावेळी उपसरपंच विनय पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, ग्रामसेवक संग्राम सुतार, तलाठी जयवंत सूर्यवंशी, मंडल अधिकारी लोहार, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते.