आष्ट्यात उद्यापासून पाच दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:17+5:302021-07-18T04:20:17+5:30
आष्टा : आष्टा शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, १९ ते शुक्रवार, २३ अखेर आष्टा ...
आष्टा : आष्टा शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, १९ ते शुक्रवार, २३ अखेर आष्टा शहरात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारपासून आष्टा शहरात किराणा, बेकरी, स्पा, सलून, बार, रेस्टॉरंट, हॉटेल, कृषिविषयक सेवा, हार्डवेअर, बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या, तसेच इतर आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. दूध वितरणासाठी व विक्रीसाठी सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते ८.३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. फळे, भाजी मंडई पूर्णत: बंद राहणार आहे, तसेच रस्त्यावर फळे, भाजी व इतर विक्री करण्यास प्रतिबंध राहणार आहे. औषध दुकाने व रुग्णालये सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.