फसवणूक करणाऱ्या पाच मुकदमांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:19 AM2021-01-01T04:19:03+5:302021-01-01T04:19:03+5:30

व कडेगाव पोलिसात जालना, बीड व यवतमाळ जिल्ह्यातील पाच मुकादमांवर वेगवेगळ्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश ...

Five fraud cases have been registered | फसवणूक करणाऱ्या पाच मुकदमांवर गुन्हा दाखल

फसवणूक करणाऱ्या पाच मुकदमांवर गुन्हा दाखल

Next

व कडेगाव पोलिसात जालना, बीड व यवतमाळ जिल्ह्यातील पाच मुकादमांवर वेगवेगळ्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी प्रकाश गणा राठोड (वय ६७, रा. मोहाडी, जि. जालना) व साजन परशराम राठोड (२६, रा. निरखेड, जि. जालना) या दोन मुकादमांवर चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात, तर नारायण महादेव नलवडे (रा. साकशाल पिंपरी, ता. गेवराई, जि. बीड), राणू बळीराम जाधव (२८) व सतीश बळीराम जाधव (३२, दोघेही रा. कवडीपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) या तीन मुकादमांवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वरील सर्व मुकादमांनी वाहन मालकांशी ऊसतोड मजूर पुरवठा करतो, असे सांगून नोटरी करारपत्र लिहून दिले आहे. रोख किंवा बँक आरटीजीएसद्वारे लाखो रुपयांची रक्कम घेऊन मजूर पुरवठा केला नाही. रक्कमही परत दिली नाही.

यामध्ये संपत भाऊ जाधव (वय ६६, रा. सोनसळ, ता. कडेगाव) यांच्याकडून ९ लाख ३० हजार रुपये, जयसिंग पवार (रा. तडसर) यांच्याकडून चार लाख रुपये घेऊन प्रकाश राठोड या मुकादमाने फसवणूक केली आहे. याशिवाय साजन परशराम राठोड या मुकादमाने विजय मांडके (रा. शिरसगाव) यांची सहा लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिसात दोन मुकादमांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याशिवाय दत्तात्रय दिनकर देसाई (६०, रा. कडेगाव) यांचेकडून तीन लाख ८५ हजार रुपये घेऊन नारायण नलवडे या मुकादमाने फसवणूक केली आहे. संदीप राजेंद्र शिंदे (३२, रा. कडेगाव) यांची राणू बळीराम जाधव व सतीश बळीराम जाधव या दोघांनी ९ लाख ५०

हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिसात फिर्याद दाखल आहे.

Web Title: Five fraud cases have been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.