सेतू कार्यालयाला पाचशे रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:49 AM2021-03-04T04:49:15+5:302021-03-04T04:49:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल ‘सेतू’ कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल ‘सेतू’ कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी ही कारवाई केली.
महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी महापालिका क्षेत्रात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या पाच व्यक्तींवर कारवाई करण्यात आली तर २ ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याबद्दल सांगलीतील सेतू कार्यालयाला ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, वैभव कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.