नाशिकमधील ‘ढोकेश्वर’च्या कर्मचाºयांकडून पाच लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:31 PM2019-02-20T21:31:16+5:302019-02-20T21:34:01+5:30
नाशिक जिल्ह्यातील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या विटा शाखा वर्धापनदिनी ठेव ठेवणाºया ठेवीदारांच्या ठेवीवर आकर्षक व्याज देण्यासह एक लाख रूपयांच्या ठेवींवर एक ग्रॅम सोने देण्याची
विटा (सांगली) : नाशिक जिल्ह्यातील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या विटा शाखा वर्धापनदिनी ठेव ठेवणाºया ठेवीदारांच्या ठेवीवर आकर्षक व्याज देण्यासह एक लाख रूपयांच्या ठेवींवर एक ग्रॅम सोने देण्याची खोटी जाहिरातबाजी करून विटा येथील सुधाकर चतुरलाल शहा यांची पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संजय सुमतीलाल शहा (रा. विटा) व ढोकेश्वर संस्थेच्या रिजनल आॅफिसर म्हणून काम पाहणाºया सौ. विजया सर्जेराव सावंत (रा. पलूस) या दोघांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
लासलगाव येथील ढोकेश्वर संस्थेची विटा येथे शाखा आहे. या संस्थेच्या रिजनल आॅफिसर म्हणून पलूस येथील सौ. विजया सावंत काम पाहत आहेत, तर संजय शहा संस्थेसाठी काम करीत होता. येथील पार्श्वनाथ पतसंस्थेचे संस्थापक सुधाकर शहा यांना संजय शहा याने ढोकेश्वर संस्थेत ठेव ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावेळी सुधाकर शहा यांनी त्या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती घेतली असता, संजय शहा व रिजनल आॅफिसर सौ. सावंत यांनी विश्वास देऊन संस्था भक्कम असून ५ लाख रुपयांच्या ठेवीच्या रकमेवर वर्षभरात तुम्हाला ५ लाख ६२ हजार ५०० रूपयांचा परतावा मिळण्याचे आमिष दाखविले.
तसेच वर्धापनदिनी ठेव दिल्यास १ लाख रूपयांच्या ठेवीवर एक ग्रॅम सोने देण्यात येणार असल्याची जाहिरात शहा यांना दाखविली. त्यामुळे शहा यांनी ठेव म्हणून दि. ७ आॅगस्ट २०१७ रोजी पाच लाख रूपयांच्या रकमेचा धनादेश शहा यांनी दिला. त्यावेळी ढोकेश्वर पतसंस्थेने दि. ८ आॅगस्ट २०१७ या तारखेची पाच लाख रूपयांची डिपॉझिट पावती शहा यांना दिली व या पतसंस्थेच्या ठेवीस विमा संरक्षण असून ही संस्था लवकरच बॅँकेत रूपांतरित होणार असल्याचे शहा यांना सांगितले.
त्यानंतर ढोकेश्वर संस्थेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने संस्था अडचणीत असल्याचे शहा यांना समजले. त्यामुळे त्यांनी दि. १६ आॅक्टोबर २०१७ ला कर्ज मागणीचा अर्ज संस्थेकडे दिला. परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.