बेकायदा गर्भपातप्रकरणी पाच आमदारांची लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:03 AM2018-11-20T00:03:43+5:302018-11-20T00:03:47+5:30

सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच आमदारांनी लक्षवेधी सादर केली आहे. मंगळवारी सभागृहाच्या विषयपटलावर ...

Five legislators eye for illegal miscarriage | बेकायदा गर्भपातप्रकरणी पाच आमदारांची लक्षवेधी

बेकायदा गर्भपातप्रकरणी पाच आमदारांची लक्षवेधी

Next

सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच आमदारांनी लक्षवेधी सादर केली आहे. मंगळवारी सभागृहाच्या विषयपटलावर लक्षवेधी येऊन याप्रकरणी चर्चा होणार आहे. शासनाने मागितलेले अहवाल व कागदपत्रे घेऊन महापालिका अधिकारी अधिवेशनास रवाना झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगलीच्या गणेशनगर येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये छापा टाकून बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उजेडात आणले होते. राज्यभर हे प्रकरण गाजले. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. विजयकुमार शामराव चौगुले व त्यांच्या पत्नी डॉ. रूपाली चौगुलेस अटक केली होती. रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताचे साहित्य, औषधी गोळ्या, इंजेक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांचा गर्भपात या रुग्णालयात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येचे प्रकरण ताजे असतानाच, सांगलीतील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे राज्यभर याची चर्चा झाली. गर्भपात प्रकरणातील संशयित डॉ. रूपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले शासकीय सेवेत होते.
त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांची सनद रद्द होण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला होता. या प्रकरणाच्या चौकशीबाबत आता अनेक पक्ष, संघटना प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कागदपत्रांसह अधिकारी रवाना
गर्भपात प्रकरणाबाबत शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश फतेपेकर, आमदार सुनील शिंदे, भाजपचे आमदार संजय सावकारे व आमदार सुधाकर कोल्हे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे आयुक्तांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी सुनील कवठेकर कागदपत्रे घेऊन अधिवेशनासाठी रवाना झाले आहेत.

Web Title: Five legislators eye for illegal miscarriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.