ब्रह्मनाळमध्ये आणखी पाच जणांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:39 AM2019-08-11T05:39:36+5:302019-08-11T05:40:10+5:30
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे गुरुवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या आणखी पाच व्यक्तींचे मृतदेह शनिवारी तिसऱ्या दिवशी पाण्याच्या प्रवाहात एनडीआरएफच्या जवानांना आढळून आले.
पलूस (जि.सांगली) : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे गुरुवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या आणखी पाच व्यक्तींचे मृतदेह शनिवारी तिसऱ्या दिवशी पाण्याच्या प्रवाहात एनडीआरएफच्या जवानांना आढळून आले. ओळख पटल्यानंतर पलूस रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
दुपारनंतर पाण्याच्या प्रवाहात मनीषा दीपक पाटील (३१), क्षीती दीपक पाटील (४), सुनील शंकर रोगे (३३), कोमल मधुकर नरुटे (२१), सौरभ तानाजी गडदे (८) या पाचजणांचे मृतदेह आढळून आले. ब्रह्मनाळ येथे लाकडी बोट उलटली होती. बोटीत ३० पूरग्रस्त बसले होते. त्यातील केवळ सहा जणांना वाचविण्यात यश आले, तर नऊ जणांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत एकूण १७ नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत.