बोरगावप्रकरणी भाजपच्या तालुकाध्‍यक्षासह पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:28 AM2021-03-17T04:28:07+5:302021-03-17T04:28:07+5:30

पांडुरंग काळे यांच्या मृत्यूप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बोरगाव येथील ३६ आणि मणेराजुरी येथील तीनजण अशा ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल ...

Five persons including BJP taluka president arrested in Borgaon case | बोरगावप्रकरणी भाजपच्या तालुकाध्‍यक्षासह पाच जणांना अटक

बोरगावप्रकरणी भाजपच्या तालुकाध्‍यक्षासह पाच जणांना अटक

Next

पांडुरंग काळे यांच्या मृत्यूप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बोरगाव येथील ३६ आणि मणेराजुरी येथील तीनजण अशा ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद काळे यांचे भाऊ अंकुश यांनी दिली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, बोरगावचे माजी उपसरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पोपट पाटील, सदस्य सुजित वसंत पाटील आदींसह इतरांचा समावेश आहे.

पोलिसांनी आतापर्यंत नितीन पाटील, नामदेव पाटील, सुजित पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून इतर ३० संशयितांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. सोमवारी आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांना कवठेमहांकाळ येथील न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे.

Web Title: Five persons including BJP taluka president arrested in Borgaon case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.