पाच वर्षांत ‘कृष्णा’च्या प्रगतीचा आलेख उंचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:29+5:302021-01-17T04:23:29+5:30

शिरटे : गेल्या पाच वर्षांतील कृष्णा कारखान्याच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहिला आहे. चांगल्याच्या पाठीमागे राहण्याची परंपरा वाळवे तालुक्याची ...

In five years, Krishna's progress graph skyrocketed | पाच वर्षांत ‘कृष्णा’च्या प्रगतीचा आलेख उंचावला

पाच वर्षांत ‘कृष्णा’च्या प्रगतीचा आलेख उंचावला

Next

शिरटे : गेल्या पाच वर्षांतील कृष्णा कारखान्याच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहिला आहे. चांगल्याच्या पाठीमागे राहण्याची परंपरा वाळवे तालुक्याची असल्याने सामान्य सभासद हा डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील कृष्णाच्या पाठीशी ठाम उभा राहील, अशी ग्वाही राजारामबापू पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी दिली.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६ लाख २५ हजार १ व्या साखर पोत्याचे पूजन व ‘कृष्णा शक्ती’ या जैवसंजीवकाच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, इस्लामपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील, संचालक दयाभाऊ पाटील, लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, दिलीप पाटील, अमोल गुरव, ब्रीजराज मोहिते, पांडुरंग होनमाने उपस्थित होते.

अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत ‘कृष्णा’ने सातत्याने जादा दर देऊन राजारामबापू कारखान्याबरोबर दर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याने यावर्षी एक टनही गेटकेनचा ऊस आणलेला नाही. बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील व सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टिकोनातून परिसराचा कायापालट झाला आहे. ‘कृष्णा’ची पाच वर्षांची प्रगती ही चढत्या क्रमांकाची आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, कामगार युनियन अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेश मंडळ अध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. निवास पवार, शशिकांत पाटील, जे. डी. मोरे, तानाजी पाटील, सुनील पोळ, बी. जी. पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रमोद शिंदे, महीपती पाटील, सर्जेराव पाटील, विश्वजीत पाटील उपस्थित होते.

फोटो : १६ शिरटे १

ओळ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे विजयबापू पाटील यांच्या हस्ते साखर पोतीपूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, संजय पाटील, रणजीत पाटील उपस्थित होते.

Web Title: In five years, Krishna's progress graph skyrocketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.