वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:48 PM2019-08-14T14:48:25+5:302019-08-14T14:49:33+5:30

पुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

Flood afflicted with deprivation, Prakash Ambedkar adopts 'Brahmanal' of sangli flood affected village | वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

Next

सांगली – सांगली जिल्ह्याच्या पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले होते. पुराच्या पाण्यात संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असताना सैन्याचे जवान, एनडीआरफ आणि स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. त्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीकडून प्रकाश आंबेडकर यांचे आभारही मानण्यात आले आहे. 

पुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रह्मनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे सरपंच व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आंबेडकर यांचे आभार मानले असून आपले प्रतिनिधी सचिन माळी आणि डॉ. अनिल गुरव यांनी आमच्या गावात पाहणी केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, आमचे गाव पुनर्वसनासाठी आपणास दत्तक देत असल्याचेही सरपंचांनी लिहिलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच गाव दत्तक घेतल्यानंतर नेमकं काय करण्यात येईल, याबाबतही सरपंच यांनी माहिती दिली आहे. 

1. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.

2. 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.

3. गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.

4. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.

5. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.

6. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

Web Title: Flood afflicted with deprivation, Prakash Ambedkar adopts 'Brahmanal' of sangli flood affected village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.