पुनवत, सागाव भागात पूरपरिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:17+5:302021-07-23T04:17:17+5:30
पुनवत : गुरुवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यातील पुनवत, सागाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वारणा नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली ...
पुनवत : गुरुवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यातील पुनवत, सागाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वारणा नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली आहे. सागाव येथे वारणेच्या पाणीपातळीत वाढ झाली असून सायंकाळी चारच्या सुमारास पुराचे पाणी बौद्ध वस्तीत शिरले. दोन्ही स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.
सागाव येथील नदी परिसरातील वस्त्यांवरील सर्व जनावरे व साहित्य नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलवले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. कणदूर, पुनवत, शिराळे खुर्द, फुपेरे परिसरातील शेकडो एकरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे तसेच ऊसाची पिके कोलमडली आहेत. शिराळेखुर्द - माणगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतांचे बांध फुटून नुकसान झाले आहे. वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्याने नागरिक सतर्क झाले आहेत.