कोरोनामुक्त रुग्णांवर लक्ष्मीनगरमध्ये पुष्प वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:56+5:302021-06-05T04:19:56+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गांव हाॅसपाॅट बनण्याच्या वाटेवर आले असताना, गावच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नेटक्या नियोजनामुळे याला आवर घालणे शक्य ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गांव हाॅसपाॅट बनण्याच्या वाटेवर आले असताना, गावच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नेटक्या नियोजनामुळे याला आवर घालणे शक्य झाले आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीबरोबरच आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
जिल्हा परिषदेच्या लक्ष्मीनगरच्या मराठी शाळेत गृहविलगीकरणात असलेले रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठविण्यात आले. यावेळी घरी जाणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांवर पुष्प वर्षाव करण्यात आला. कोरोनाचे भय कमी करण्यासाठी अशा रुग्णांना सन्मानाने घरी पाठविण्यात आले. यावेळी नोडल अधिकारी शीतल उपाध्ये यांनी कोरोनामुक्त रुग्णांना मार्गदर्शन केले. ग्रामसेविका उज्ज्वला आवळे यांनी गाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. कोरोनामुक्त रुग्णांच्या स्वागतप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार, सदस्या स्वाती आवटी, रामकृष्ण आवटी याशिवाय हिंदमाता मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.