फुले दाम्पत्याच्या संघर्षामुळे महिलांना मानाचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:47+5:302021-03-10T04:26:47+5:30
इस्लामपूर येथे कोरोना महिला योद्धांचा सत्कार नगरसेविका कोमल बनसोडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जयश्री माळी, सीमा पवार, सुवर्णा बनसोडे ...
इस्लामपूर येथे कोरोना महिला योद्धांचा सत्कार नगरसेविका कोमल बनसोडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जयश्री माळी, सीमा पवार, सुवर्णा बनसोडे उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने केलेल्या संघषार्मुळे अनेक महिलांना मानाचे स्थान मिळाले आहे. शिक्षणामुळे त्यांचा गौरव झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी विविध कायदे व मतांचा अधिकार दिला. त्यामुळे महिलांच्या संरक्षणात वाढ झाली. कोरोनाच्या काळात कुटुंबाचा विचार न करता लढणाऱ्या महिलांचे कौतुक करणे ही आमची सामाजिक जबाबदारी असल्याचे मत नगरसेविका कोमल बनसोडे यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्या सत्कार बनसोडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सभापती जयश्री माळी, उपसभापती सीमा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दीपाली पाटील, स्मिता सनगर, वैशाली चव्हाण, कविता वाकोडे, राणी कदम, कोमल जाधव, पौर्णिमा पाटील, स्नेहा जाधव, माया जाधव, दीपाली सुतार, प्रियांका वीरकर, मीना रासकर, मनीषा नुलके, रसिका जाधव, विद्या कांबळे, नेहा पवार अश्विनी साळुंखे, सुचिता डांगे, पद्मजा माळी, शुभांगी अजमने, साधना ताठे, कांचन जाधव, वर्षा मोरे, नीता माने, चैताली आजमने या आशा स्वयंसेविकांचा साडी देऊन सत्कार करत ऋण व्यक्त करण्यात आले.
यावेळी सुवर्णा बनसोडे, प्रतीक्षा देशमुख, मनीषा कांबळे, मानसी कांबळे, कांता सूर्यगंध, रोहिणी पवार, ऐश्वर्या इटकरकर, उषा हांडे, बबिता कांबळे, मंगल कांबळे, कविता घाडगे, यांची उपस्थिती होती. तेजल सूर्यगंध यांनी आभार व्यक्त केले.