झेंडूची फुले ६० रुपये किलो -: दसऱ्यामुळे दरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 07:35 PM2019-10-05T19:35:51+5:302019-10-05T19:45:43+5:30
पण, सप्टेंबर महिन्यात झेंडूचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपये किलोपर्यंत उतरले होते. यावेळी मशागत आणि औषधाचाही खर्च शेतकºयांच्या पदरात पडेल की नाही, अशी चिंता त्यांना लागून राहिली होती.
सांगली : पितृ पंधरवड्यामुळे मागील आठवड्यात झेंडूचे दर १० ते २० रुपये किलोपर्यंत खाली आले होते. घटस्थापनेपासून झेंडूचे दर वाढत असून, सांगलीसह मुंबई मार्केटमध्ये झेंडूला प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अवकाळी पावसामुळे झेंडूच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे दिवाळीपर्यंत झेंडूचे दर आणखी वाढतील, असा अंदाज फूल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सांगली जिल्'ातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड, गोमेवाडी, करगणी, वाळवा तालुक्यामध्ये आष्टा, कारंदवाडी, बागणी, मिरज तालुक्यातील तुंग, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, माळवाडी, कवलापूर, खंडेराजुरी, लिंगनूर, शिपूर, पायाप्पाचीवाडी, तासगाव तालुक्यातील पुणदी, पाचवा मैल, येळावी, नागावनिमणी, कवठेएकंद, चिंचणी, पलूस तालुक्यातील भिलवडी, धनगाव, सुखवाडी, वसगडे, माळवाडी, कडेगाव, खानापूर तालुक्यातील शेतकरी झेंडूचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊ लागला आहे.
कमी कालावधित चांगले पैसे मिळत असल्यामुळे झेंडूचे पीक शेतक-यांच्या फायद्याचे आहे. पण, सप्टेंबर महिन्यात झेंडूचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपये किलोपर्यंत उतरले होते. यावेळी मशागत आणि औषधाचाही खर्च शेतकºयांच्या पदरात पडेल की नाही, अशी चिंता त्यांना लागून राहिली होती. अवकाळी पावसामुळे झेंडू पिकाचे सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्'ात मोठे नुकसान झाले. यामुळे मुंबई मार्केटसह सांगलीच्या मार्केटमध्येही झेंडूचे दर वाढले आहेत. सांगली जिल्'ातील बहुतांशी झेंडू मुंबई मार्केटला जात असल्यामुळे त्यांच्यासाठी तेथील दराची तेजी फायदेशीर आहे. मुंबईतील दर वाढले की, स्थानिक बाजारपेठेतही लगेच फुलांची दरवाढ होते.
दस-याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांसह अन्य सर्वच फुलांना मागणी असल्याने फुले तेजीत आहेत. जुईच्या फुलांना २०० ते ३०० रुपये, कार्नेशियनमध्ये ५० रुपये, तर डच गुलाबाची ४० रुपयांनी वाढ झाली आहे. झेंडूच्या फुलांना त्याच्या दर्जानुसार दर मिळत होते. झेंडूच्या पिवळ्या तसेच लाल फुलांना प्रत्येकी किलोमागे ४० ते ६० रुपये दर मिळाला. कोलकाता येथील गोंड्याला ६० ते ७० रुपये, तुळजापुरी गोंड्याला ५० ते ६० रुपये; तर साध्या गोंड्याला ४० ते ५० रुपये दर मुंबई मार्केटमध्ये मिळत आहे, अशी माहिती फुले व भाजीपाल्याचे व्यापारी मनोज गाजी यांनी दिली. फुलांचे दर वाढू लागल्यामुळे शेतक-यांचा दसरा, दिवाळी सण आनंदात जाईल, अशी अपेक्षा आहे.