कोराेनाबाधितांच्या संख्येतील चढ-उतार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:42+5:302020-12-27T04:20:42+5:30
कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी त्याच्या संख्येत रोज चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून संख्या वाढली असताना शनिवारी पुन्हा ...
कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी त्याच्या संख्येत रोज चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून संख्या वाढली असताना शनिवारी पुन्हा संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा आणि तासगाव तालुक्यांत एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत २५९ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९४३ चाचण्यांमधून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उपचार घेत असलेल्या १९२ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३२ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७,४८८
उपचार घेत असलेले १९२
कोरोनामुक्त झालेले ४५,५६८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२८
शनिवारी दिवसभरात
मिरज २
आटपाडी ४
वाळवा ३
कडेगाव २
जत, खानापूर प्रत्येकी १