बासरीवादक रसूल मुलाणी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:48+5:302020-12-12T04:41:48+5:30
१११२२०२० रसुल मुलाणी निधन सांगली : ख्यातकीर्त बासरीवादक रसूल कादर मुलाणी (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...
१११२२०२० रसुल मुलाणी निधन
सांगली : ख्यातकीर्त बासरीवादक रसूल कादर मुलाणी (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला.
रसूल यांनी मिरज तालुक्यातील पद्माळेसारख्या छोट्या गावात राहून बासरीवादनाची कला लहानपणापासूनच जोपासली होती. त्यात प्रावीण्य संपादन केले होते. बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन बासरी विशारद ही पदवी मिळविली होती. ते आकाशवाणीचे बी ग्रेड मान्यताप्राप्त वादक कलाकार होते. अनेक संगीत सभांमधून त्यांनी साथसंगत केली होती. फेसबुकच्या माध्यमातून अनेकविध गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली होती. भजन हीदेखील त्यांची खासीयत होती. अनेक व्यावसायिक, सांस्कृतिक व सेवाभावी सांगीतिक कार्यक्रमांत रसूलभाईंची बासरी रसिकांची दाद घेऊन जायची. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
-------------