चारा छावण्यांची डेडलाईन वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:44 PM2019-07-19T23:44:57+5:302019-07-19T23:45:01+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र दुष्काळी परिस्थिती अद्यापही कायम आहे. ...

Fodder camps to increase deadline? | चारा छावण्यांची डेडलाईन वाढणार?

चारा छावण्यांची डेडलाईन वाढणार?

googlenewsNext

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र दुष्काळी परिस्थिती अद्यापही कायम आहे. मान्सूनचा पाऊसच या भागात न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ६७ ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या असून, शासन निर्णयानुसार त्यांना १ आॅगस्टची मुदत असणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीरच असल्याने चारा छावण्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शासनाने जानेवारीपासूनच आठ प्रकारच्या सवलती या भागात सुरू केल्या आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात एकही टॅँकर सुरू नव्हता. अशी स्थिती असताना आता पिण्याच्या पाण्यासाठीच्या टॅँकरची संख्या अडीचशेवर गेली आहे. एप्रिल महिन्यात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाल्याने चारा छावण्यांची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात कमी चारा छावण्या सुरू झाल्या असल्या तरी नंतर काही जाचक अटी रद्द केल्याने चारा छावण्यांची संख्या वाढलेली आहे.
जिल्ह्यात ६८ ठिकाणी चारा छावण्या होत्या. त्यातील डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील चारा छावणी बंद करण्यात आल्याने सध्या ६७ चारा छावण्या सुरू आहेत. ज्यामध्ये ४४ हजार ९५० जनावरे दाखल आहेत. बार कोड टॅगिंग व कॅटल कॅम्प मॅनेजमेंट अ‍ॅपवर जनावरांची ९९.९२ टक्के नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३० चारा छावण्या जत तालुक्यात सुरू आहेत.
राज्य शासनाच्या ६ जुलैच्या निर्णयानुसार दुष्काळी जाहीर केलेल्या भागात सुरू असलेल्या चारा छावण्या १ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चारा छावण्या सुरू असलेल्या भागात गेल्या पंधरा दिवसांत झालेला पाऊस व चाºयाची उपलब्धता लक्षात घेऊन टप्प्या-टप्प्याने चारा छावण्या बंद करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश होते.
येत्या पंधरवड्यात चारा छावण्या बंद होणार असल्या तरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, ती जैसे थे आहे. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, तासगाव भागात मान्सूनचे आगमनच झाले नसल्याने चाºयाची उपलब्धता झालेली नाही. विशेषत: ज्या भागात म्हैसाळ, टेंभू योजनेतून पाणी पोहोचले नाही, त्या भागातील टंचाई परिस्थिती अधिक गंभीर असल्याने १ आॅगस्टला चारा छावण्या बंद झाल्यास जनावरांचे हाल होणार आहेत.
तालुकानिहाय चारा छावण्या
व जनावरांची संख्या
तालुका छावण्या जनावरे
आटपाडी २७ १९६३३
जत ३० १८०९१
कवठेमहांकाळ ८ ६००८
खानापूर १ ३५४
कडेगाव १ २४६
एकूण ६७ ४४४९५

Web Title: Fodder camps to increase deadline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.