सांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:27 AM2019-03-05T11:27:34+5:302019-03-05T11:29:32+5:30

सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून मंगळवारी धुक्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे.

Fog in Sangli for two days | सांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरी

सांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरीजिल्हयात तापमानातील चढ-उतार कायम

सांगली : जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून मंगळवारी धुक्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे.

गेली वर्षभर वातावरणातील लहरीपणाचा अनुभव सांगली जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. अचानक होणारा वातावरणातील बदल लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू लागला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३४ ते ३७ अंशाच्या घरात राहिले आहे.

किमान तापमानातही वाढ होताना दिसते. अशातच सोमवारी व मंगळवारी पहाटे दाट धुके पडले होते. धुक्यांनी शहराला तासभर कवेत घेतले होते. सकाळी साडे सातनंतर धुके कमी झाले. सोमवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३५ अंशापर्यंत गेले होते.

किमान तापमान १६ अंशाच्या घरात होते. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच ते सहा दिवसात तापमानात वाढच होणार आहे. जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावर जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Fog in Sangli for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.