सांगलीत पसरली धुक्याची चादर, थंडीचा कडाका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:42 IST2024-12-21T11:41:44+5:302024-12-21T11:42:14+5:30
सुरेंद्र दुपटे संजयनगर ( सांगली ) : गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक ऊन अन् रात्री गारडा असे वातावरण अनुभवास ...

सांगलीत पसरली धुक्याची चादर, थंडीचा कडाका वाढला
सुरेंद्र दुपटे
संजयनगर (सांगली) : गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक ऊन अन् रात्री गारडा असे वातावरण अनुभवास येत आहे. यातच आज, पहाटे सांगलीत दाट धुक्याची चादर पसरली होती. गुलाबी थंडी आणि दाट धुके असे वातावरण सांगलीकरांनी अनुभवले. धुक्यामुळे आज, सूर्यदर्शन उशिरा घडले.
धुक्यामुळे सूर्यदर्शन उशिरा झाले. सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील उपनगरामध्ये धुके पसरले होते. त्यामुळे वाहनचालकांना गाडीच्या लाईट लावून प्रवासा करावा लागत होता. वाहतूक संतगतीने सुरू होती. सांगलीतील तापमान सरासरी १२ ते १५ अंश सेल्सियस होते.