लोकमतच्या बातमीची दखल, डेंग्यू-चिकनगुनियाचा सर्व्हे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:41 PM2021-05-11T19:41:10+5:302021-05-11T19:51:32+5:30
dengue Hospital Sangli : म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेग्यू व चिकनगुनीयाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या आशयाची बातमी लोकमतने १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज सांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची टिम आज म्हैसाळ मध्ये दाखल झाली.याबद्दल नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेग्यू व चिकनगुनीयाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या आशयाची बातमी लोकमतने १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज सांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची टिम आज म्हैसाळ मध्ये दाखल झाली.याबद्दल नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.
जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाचे किटक संहारक अनिल खराडे, क्षेत्रकार्यकरता योगेश पाटील, किरण पाटील, आरोग्य सेवक सुहास डोंगरे यांनी गावातील शेडबाळ रस्ता, बंगला रोड, अंबिकनगर या भागाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणच्या पाण्याच्या टाकीत त्यांना डेग्यू व चिकनगुनियाचे डास आढळून आले असून काही पाण्याच्या टाकीमध्ये त्यांनी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्रांतून गप्पी मासे सोडले आहेत.
काही जणांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यांच्या सुचना दिल्या आहेत. ही टिम दोन दिवस म्हैसाळमध्ये तपासणी करणार आहे.अन्य कोणत्या ठिकाणी या साथीचा फैलाव होत असल्यास आरोग्य विभागाला याबाबत कळवावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार खंदारे, अशोक वडर उपस्थित होते.
लोकमतने १० मे रोजी म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाची साथ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत आम्ही सांगलीजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज तपासणी करण्यासाठी हजर झालो आहोत. काही ठिकाणी तपासणी झाली आहे. तेथे डेग्यू व चिकनगुनियाचे डास आढळून आले आहेत.तेथे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. अद्याप इतर ठिकाणची तपासणी करणार आहोत.
- अनिल खराडे
किटक संहारक, जिल्हा परीषद आरोग्य (हिवताप) विभाग -सांगली
म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाचे रूग्ण आढळत आहेत.ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्या रक्ताची तपासणी करून त्याच्यावर उपचार केले जातील
-डॉ नंदकुमार खंदारे
वैद्यकीय अधिकारी, म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्र
लोकमतच्या बातमीची दखल, लोकमतचे कौतुक
डेग्यू व चिकनगुनीया बाबत आवाज उठवावी अशी मागणी लोकमच्या वाचकांकडून होत होती.त्यानुसार लोकमतने १० मे रोजी म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाची साथ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत दुसऱ्या दिवशी जिल्हा परीषदेची आरोग्य विभागाची टिम म्हैसाळ मध्ये दाखल झाली आहे. त्याचे नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.