कर्मवीर पतसंस्थेकडून पूरग्रस्तांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:47+5:302021-07-31T04:26:47+5:30
सांगली : पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर पतसंस्थेकडून ५१ हजारच्या मदत निधीचा धनादेश दक्षिण भारत जैन सभेच्या आपत्ती निवारण निधीस कर्मवीर ...
सांगली : पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर पतसंस्थेकडून ५१ हजारच्या मदत निधीचा धनादेश दक्षिण भारत जैन सभेच्या आपत्ती निवारण निधीस कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याशिवाय पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्यावतीने उदगाव, चिंचवाड, आरग व जयसिंगपूर परिसरातील विविध ठिकाणी निवारा घेतलेल्या १००० पूरग्रस्तांना जेवण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले, माणसाला संकटात मदत करण्यामध्येच खरी माणुसकी आहे. अशा प्रसंगी मिळालेली लहानात लहान मदतसुद्धा एखाद्याचे आयुष्य उभे करण्यास मोलाची ठरू शकते. कर्मवीर पतसंस्था सदैव समाजासाठी अग्रेसर राहील.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष भारती चोपडे, संचालक ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, वसंतराव नवले, ए. के. चौगुले (नाना), लालासाहेब थोटे, ललिता सकळे, तज्ज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके), मुख्य कार्यकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.