खाद्यपदार्थाला उगमस्थानाच्या मातीचा गंध असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:54+5:302021-01-25T04:27:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : देश-विदेशांतील खाद्यसंस्कृतींचा मिलाफ खाद्ययात्रेला अधिक रसदार बनवितो. जिथून तो पदार्थ येतो त्या ठिकाणच्या मातीचा ...

The food smells of soil of origin | खाद्यपदार्थाला उगमस्थानाच्या मातीचा गंध असतो

खाद्यपदार्थाला उगमस्थानाच्या मातीचा गंध असतो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : देश-विदेशांतील खाद्यसंस्कृतींचा मिलाफ खाद्ययात्रेला अधिक रसदार बनवितो. जिथून तो पदार्थ येतो त्या ठिकाणच्या मातीचा गंधही घेऊन येतो. त्यामुळे ही संस्कृती अधिक सुगंधी व चवदार बनत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी व्यक्त केले.

सांगलीच्या वेलणकर सभागृहात चतुरंग प्रकाशनातर्फे रविवारी सुमन टिळक यांच्या ‘आइस्क्रीम, सरबते, जॅम, सॉस आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. भवाळकर, लेखक प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनिल मडके, अविनाश टिळक, सुमन टिळक उपस्थित होते.

आमदार गाडगीळ म्हणाले की, टिळक यांचा परिवार म्हणजे आमच्या राजवाडा परिवाराचा एक भाग आहे. समाजात वावरताना या परिवाराने साधेपणा जपला. माणसे जोडत लेखनाच्या या क्षेत्रात त्यांनी यापुढेही कार्यरत राहावे.

प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, अविनाश टिळक यांचे घर म्हणजे टिळक व रानडे संस्कृतीचा उत्तम मिलाफ आहे. टिळक दाम्पत्य सांस्कृतिक, संपन्न जीवन जगण्यात यशस्वी झाले आहे. जीवनात रस घेऊन एकमेकांत समरस होत कसे जगावे, याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर उभे केले आहे. सध्या पाककलेच्या पुस्तकांना अन्य पुस्तकांपेक्षा अधिक मागणी आहे. त्यामुळे सुमन टिळक यांनी हे लेखन पुढे चालू ठेवावे.

डॉ. अनिल मडके म्हणाले की, इतिहासात रमण्यापेक्षा वर्तमानात जगत भविष्याचा वेध घेणारे हे दाम्पत्य आहे. माणसाने खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. खाद्यसंस्कृती जपताना, तिचा आनंद घेताना जिभेवरचे नियंत्रणही महत्त्वाचे असते. ते जसे खाण्याच्या बाबतीत लागू आहे, तसे संवादाच्या बाबतीतही लागू आहे.

यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, मिलिंद गाडगीळ, सतीश डोडिया, डॉ. भरत शहा, डाॅ. सुरेश उपळावीकर, विद्याधर गोखले, अरुण दांडेकर, बंडा यज्ञोपवित, चंद्रकांत शहा, मणीबेन शहा, जनार्दन लिमये, अतुल गिजरे, सुहास करंदीकर, चतुरंग प्रकाशनचे प्रशांत कुलकर्णी, प्रमोद गोसावी, उमेश देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मकरंद टिळक, रवींद्र टिळक, अनया टिळक, सनीत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. महेश कराडकर यांनी स्वागत, प्रा. मंजिरी घरत यांनी प्रास्ताविक, तर मधुरा टिळक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संदीप घरत यांनी आभार मानले.

Web Title: The food smells of soil of origin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.